केंद्र सरकारला गरिबांपर्यंत योजना पोहोचवण्यात यश : महामंत्री कैलास विजयवर्गीय

कैलास विजयवर्गीय

धुळे : पुढारी वृत्तसेवा 

केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या नऊ वर्षांमध्ये या देशातील प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचतील, अशा योजना राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक धर्माच्या गरजूंना देण्याचे काम केले आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती सुरू आहे, अशी माहीती भाजपाचे केंद्रीय महामंत्री खासदार कैलास विजयवर्गीय यांनी आज धुळ्यात दिली.

धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार जयकुमार रावल, महापौर प्रतिभा चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, यशवंत येवलेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार विजयवर्गीय यांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्रातील सरकारने केलेल्या विकासाचे रिपोर्ट कार्ड जनतेपर्यंत ठेवण्याचे काम आम्ही करतो आहोत. 2019 नंतर या देशात विश्वव्यापी महामारी कोविडच्या रूपाने आली. या महामारीने जगाला मोठ्या त्रासात आणले. मात्र अशा काळात भारताने स्वतः प्रतिबंधित लस तयार करून त्याचा पुरवठा जगातील अनेक देशांना देखील केला आहे. त्यामुळे कोविड वर मात करण्यात आपल्याला यश मिळाले. आज जगात आर्थिक मंदी आहे. जगातील प्रमुख देशांचा जीडीपी पाहिल्यास भारताचा जीडीपी त्या तुलनेत 6.1 असा आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये महागाईचा दर कमी असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

सरकारने सर्विस सेक्टर ,उत्पादन आणि पुरवठा या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे  जीडीपी वर त्याचा प्रभाव आहे. 2014 च्या तुलनेत कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये वाढ केली आहे. संरक्षण क्षेत्रात देखील भारत आता स्वयंपूर्ण झाला आहे. 2014 पूर्वी संरक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या वस्तू भारतात उत्पादित होत नव्हत्या. मात्र आता संरक्षण क्षेत्रातील वस्तूंचे उत्पादन सुरू झाले असून जगभरातील 86 देशांना भारत निर्यात करतो आहे. भारतीय जनता पार्टीने कधीही सत्तेचा नव्हे तर देशाची चिंता केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या विकास करणे हाच या पक्षाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

या देशातील प्रत्येक योजना या देशातील सर्वसामान्य व्यक्तीला नजरेसमोर ठेवून तयार केली गेले आहे. जातीच्या आधारावर कोणतीही योजना तयार केलेली नाही. ही योजना गरिबांपर्यंत पोहोचावी व त्यांचा विकास व्हावा हाच या पक्षाचा अजेंडा असल्याचे देखील त्यांनी सांगितले. भारताच्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला. यानंतर गरिबांसाठी घरकुल योजना देखील राबवली. त्या काळात 27 लाख घर बनवण्यात आले. मात्र आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत साडे तीन कोटी घर तयार केले असून आणखी 50 लाख घर तयार करून गरजूंना देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर असून 2024 पर्यंत ही चौथ्या क्रमांकावर येणार आहे .सरकारने आयुष्यमान भारत योजनेच्या नावाखाली आरोग्याचे संरक्षण म्हणून 50 कोटी लोकांना सुरक्षित केले आहे. 2014 पूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागात केवळ 80 हजार विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी दाखला दिला जात होता. पण आता ही संख्या एक लाख 56 हजार पर्यंत गेली असून यात आणखी वाढ होणार आहे

हेही वाचा :

The post केंद्र सरकारला गरिबांपर्यंत योजना पोहोचवण्यात यश : महामंत्री कैलास विजयवर्गीय appeared first on पुढारी.