कॉलेज तरुणीचे अपहरण करून बळजबरीने लावला विवाह

वधूचा पोबारा,www.pudhari.news

पिंपळनेर, धुळे : पुढारी वृत्तसेवा
कॉलेज तरुणीचे अपहरण करुन तिचे बळजबरीने लग्न लावून देणा-या  ७ जणांविरोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील रहिवासी असलेल्या व सध्या साक्री तालुक्यातील (धुळे जिल्हा) शेवाळी येथे राहणाऱ्या २२ वर्षीय कॉलेज तरुणीने पोलिसांत याविषयी फिर्याद दिली आहे.  दिलेल्या फिर्यादीनुसार शेवाळी येथील रहिवासी असलेल्या व सध्या नाशिकला राहणाऱ्या तुषार मधुकर साळूंखे याने पिडीत तरुणीला तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. त्यानंतर दमदाटी आणि ब्लॅकमेल करुन तिच्या मर्जीविरुध्द जबरदस्तीने वैदीक पध्दतीने तिच्याशी विवाह केला.

याप्रकरणात त्याचे मित्र पुष्पेंद्र नानाभाऊ साळूंखे, अतुल रामदास सूर्यवंशी दोघे रा. नाशिक अनिकेत सुनिल पवार रा.मळखेडा ता.साक्री यांनी त्याची मदत केली. पिडीत तरुणीच्या नातेवाईकांनी तुषारची आई उषाबाई मधुकर साळूंखे आणि वडील मधुकर सखाराम साळूंखे, भाऊ योगेश साळूंखे सर्व रा.शेवाळी यांना विचारपूस केली असता त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी साक्री पोलिसात भादंवि ४२०,३६३,५०४,५०६,५०१,३४ प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कॉ. एन. बी. सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा :

The post कॉलेज तरुणीचे अपहरण करून बळजबरीने लावला विवाह appeared first on पुढारी.