क्रिकेट स्पर्धा : आजपासून किशोर सुर्यवंशी मेमोरियल ट्राॅफी आंतर तालुकानिहाय निवड प्रक्रियेस प्रारंभ 

क्रिकेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ होत आहे. त्यासाठी आज बुधवार, दि. २ नोव्हेंबरपासून तालुकानिहाय निवड प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या दिवशी मालेगाव व इगतपुरी येथे क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे हे नववे वर्ष असून या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडूंना जिल्हास्तरावर कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. तसेच स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध निवड समिती सदस्य जिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यात जाऊन निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक तालुक्याचा अंतिम संघ निवडणार आहेत. त्याप्रमाणे आजपासून दि. २ ते ८ नोव्हेंबर तालुकानिहाय चालणार्‍या या निवड प्रक्रिया होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा क्रिकेट असाेसिएशनचे सचिव समीर रकटे यांनी दिली.

तालुकानिहाय या ठिकाणी होणार निवड प्रक्रिया…

नाशिक – सय्यद पिंप्री ग्राउंड

त्र्यंबकेश्वर – तालुका क्रिडा संकुल अंजनेरी

निफाड – हिंगलीज माता क्रिकेट ग्राउंड, हिंगलीजनगर, खेड, उगांव

पेठ – तालुका क्रिडा संकुल

मालेगांव – एस्पायर क्रिकेट ग्राउंड, शिवाजीनगर

चांदवड –

येवला – पृथ्वी हॉटेल समोरील मैदान, कोटमगांवरोड

सटाणा – एन. एम. सोनवणे आर्टस्, कॉमर्स सायन्स कॉलेज.

देवळा – एकता क्रिकेट क्लब ग्राउंड, गुंजाळनगर.

दिंडोरी – कचरु भिवाजी दवंगे मैदान, खेडगाव

कळवण – जे. पी. स्टेडियम, शरद पवार इंग्लिश मिडीयम स्कूल

सिन्नर – कानडी मळा, बारागाव पिंपरीरोड

इगतपुरी – तालुका क्रिडा संकुल, गोळीबार मैदान

नांदगाव – भगावान महर्षी क्रिडा संकुल

सुरगाणा – खोकरी क्रिकेट ग्राउंड

हेही वाचा:

The post क्रिकेट स्पर्धा : आजपासून किशोर सुर्यवंशी मेमोरियल ट्राॅफी आंतर तालुकानिहाय निवड प्रक्रियेस प्रारंभ  appeared first on पुढारी.