‘क्रॉस कंट्री’साठी नाशिकच्या संजीवनीची निवड

sanjivini jadhav www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येत्या शनिवारी (दि.18) ऑस्ट्रेलियातील बाथर्स्ट येथे 44 वी जागतिक अ‍ॅथलेटिक्स क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडणार आहे. 10 किलोमीटर (सिनियर महिला-पुरुष), 8 किलोमीटर (ज्युनिअर महिला-पुरुष), 4बाय2 (मिक्स रिले) या प्रकरात स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत 48 देशांतील 453 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव हिची निवड झाली आहे. ती या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. संजीवनी ही प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांच्या मार्गदर्शनखाली नियमित सराव करते. दरम्यान, संजीवनीच्या सहभागामुळे शनिवारी (दि.18) रंगणार्‍या मॅरेथॉनकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

The post ‘क्रॉस कंट्री’साठी नाशिकच्या संजीवनीची निवड appeared first on पुढारी.