Site icon

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा
पोलीस विभागाशी संबंधीत कायदा व सुव्यवस्था तसेच इतर विभागांशी संबंधीत तक्रारींच्या तत्काळ निरसनासाठी बुधवार (दि.31) श्री गणेशाचे आगमन झाल्यापासून ते शुक्रवार (दि.9) गणपती विसर्जनपर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील गणेशमंडळांबाबत गणेश भक्तांना गणेशोत्सवाशी संबंधीत कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे. बुधवार (दि.31) पासून गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव काळात मंडळांच्या व गणेश भक्तांच्या अडचणी तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे 24 तास हेल्पलाईन सेवा कार्यान्वीत करण्यात आली असून त्याबाबतचा हेल्पलाईन क्रमांक 7620006402 असा आहे. पोलीस, महावितरण, नगर पालिका, नगर पंचायत, ग्राम पंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व महसुल विभाग यासारख्या विभागांशी संबंधीत असलेल्या अडचणी व तक्रारी याबाबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी संबंधित विभागाशी संपर्क साधून तक्रारीचे निरसन करुन घेतील. संबंधित तक्रारदारास तक्रारीचे निराकरण झाले किंवा कसे? याबाबतची खात्री स्वत: नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक करणार आहेत.

हेही वाचा:

The post गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत appeared first on पुढारी.

Exit mobile version