गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष नाशिकच्या श्री रेणुकामाता व शनीदेवा चरणी लीन

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा 

गुजरात राज्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी. आर. पाटील यांनी चांदवड निवासीनी राजराजेश्वरी, कुलस्वामिनी, साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या श्री रेणुका मातेचे व वरदर्डी येथील प्राचीन जागृत देवस्थान असलेल्या शनी देवाचे सहपत्नीक दर्शन घेतले.

गुजरात राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सरकार आणण्यात महत्वाची भूमिका प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी. आर. पाटील यांनी निभावली आहे. राज्यात एकहाती सत्ता आल्यानंतर मुळचे महाराष्ट्राचे भूमिपुत्र असलेल्या पाटील यांनी शनी आमावस्येनिमित्त चांदवड तालुक्यातील वरदर्डी येथील जागृत देवस्थान असलेल्या शनी मंदिरात जाऊन सहपत्नीक पूजा केली. यावेळी त्यांच्या सोबत डॉ. प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत चांदवडकर, वाल्मीक पवार, विलास पवार, मुकेश आहेर, विशाल ललवाणी, सागर कोतवाल, पराग कासलीवाल, राजेश गांगुर्डे, बाफणा आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष नाशिकच्या श्री रेणुकामाता व शनीदेवा चरणी लीन appeared first on पुढारी.