गुड फ्रायडे – 2023 : ख्रिस्ताच्या स्मरणार्थ उपनगरांमधील चर्चमध्ये प्रार्थना

गुड फ्रायडे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुड फ्रायडेनिमित्त (दि.७) शहर-परिसरातील चर्चमध्ये सामुदायिक प्राथमिक सभांचे आयोजन करण्यात आले. यावेळी येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ ख्रिश्चन बांधवांनी प्रार्थना केली.

गुड फ्रायडे www.pudhari.news
नाशिक : गुड फ्रायडेनिमित्त चर्चमधील भाविकांना संदेश देताना धर्मगुरु. (छाया : हेमंत घोरपडे)

शहरातील उपनगर, त्र्यंबकनाका, शरणपूर रोड, शालिमारसह उपनगरांमधील चर्चमध्ये या निमित्ताने सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. धर्मगुरूंनी उपस्थितांना गुड फ्रायडेनिमित्त संदेश दिला. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सहाव्या दिवशी ‘गुड फ्रायडे’ हा दिवस येत असतो. त्यानंतर ईस्टरचा सण असतो. चर्चच्या लूनर कॅलेंडरनुसार, ईस्टर हा पाश्चाल पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी पाळला जातो. त्यानुसार यंदाच्या वर्षी शुक्रवारी (दि.७) ‘गुड फ्रायडे’ आणि ९ एप्रिल रोजी ईस्टर पाळला जाणार आहे. गुड फ्रायडेला बायबलच्या अंतिम सात वाक्यांचे स्मरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने बांधव चर्चमध्ये उपस्थित होते.

हेही वाचा:

The post गुड फ्रायडे - 2023 : ख्रिस्ताच्या स्मरणार्थ उपनगरांमधील चर्चमध्ये प्रार्थना appeared first on पुढारी.