ग्रामपंचायत : नामांकन अर्जासाठी आज- उद्या झुंबड उडण्याची शक्यता

ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा

बागलाण तालुक्यातील 41 गावांतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवार (दि.28)पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी  (दि.2) पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. सुरुवातीला संमिश्र प्रतिसाद असला तरी अंतिम दोन दिवसांत मात्र त्यासाठी अक्षरशः झुंबड उडण्याची शक्यता आहे. विशेषत्वाने थेट सरपंचपदासाठी गावोगावी चुरस दिसून येत आहे.

तालुक्यातील काही मोठ्या गावांसह एकूण 41 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यापैकी बहुतांश गावे राजकीयद़ृष्ट्या महत्त्वाची असल्याने अनायासेच निवडणुकांसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदासाठी थेट ग्रामस्थांमधून मतदान होणार असून, त्यामुळे गावोगावी इच्छुकांची संख्या वाढली आहे. सोमवार (दि.28)पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होऊन बुधवार (दि.30)पर्यंत केवळ 144 अर्ज दाखल झालेत. तेच मात्र अखेरच्या गुरुवारी (दि.1) आणि शुक्रवारी (दि.2) या दोन दिवसांत मात्र विक्रमी संख्येने नामांकन अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. इच्छुकांना आधी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करून नंतर तो तहसील कार्यालयात मतदान कर्मचार्‍यांकडे जमा करावा लागत आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे.

गावनिहाय सरपंचपदाचे आरक्षण आणि बुधवारअखेर दाखल अर्ज असे…
पिंपळकोठे : अनुसूचित जमाती स्त्री (0), मुंजवाड : अनुसूचित जमाती (9), माळीवाडे : अनुसूचित जमाती (3), चौंधाणे : सर्वसाधारण स्त्री (0), चौगाव : अनुसूचित जमाती स्त्री (4), डांगसौंदाणे : अनुसूचित जमाती स्त्री (9), तिळवण : अनुसूचित जमाती स्त्री (0), आराई : सर्वसाधारण (20), आसखेडा : नागरिकांचा मागास प्रवर्ग (11), जायखेडा : अनुसूचित जमाती स्त्री (23), वनोली : नागरिकांचा मागास प्रवर्ग (0), गोळवाड : अनुसूचित जमाती स्त्री (0), टेंभे खालचे : सर्वसाधारण स्त्री (0), कातरवेल : अनुसूचित जमाती स्त्री (0), तळवाडे दिगर : अनुसूचित जमाती स्त्री (0), मुंगसे : अनुसूचित जमाती (10), विरगाव : सर्वसाधारण स्त्री (4), भीमखेत : अनुसूचित जमाती स्त्री (0), किकवारी बुद्रुक : अनुसूचित जमाती स्त्री (5), वटार : सर्वसाधारण (19), तांदूळवाडी : सर्वसाधारण स्त्री (0), मुल्हेर : अनुसूचित जमाती (1), मोरेनगर : सर्वसाधारण स्त्री (3), मळगाव (ति) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (9), मळगाव खुर्द : अनुसूचित जमाती (1), डोंगरेज : सर्वसाधारण (1), खिरमाणी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (1), निकवेल : अनुसूचित जमाती (0), आव्हाटी : नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (0), औंदाणे : सर्वसाधारण (0), आनंदपुर : सर्वसाधारण स्त्री (1), वाघंबे : अनुसूचित जमाती स्त्री (0), वाघळे : सर्वसाधारण (5), गोराणे : नागरिकांचा मागास प्रवर्ग (0), तळवाडे भामेर : सर्वसाधारण (0), महड : सर्वसाधारण स्त्री (0), देवठाण दिगर : अनुसूचित जमाती स्त्री (0), टेंभे वरचे : नागरिकांचा मागास प्रवर्ग (1), मानूर : अनुसूचित जमाती (4), जाखोड : अनुसूचित जमाती (0), ढोलबारे : नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (0)

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत : नामांकन अर्जासाठी आज- उद्या झुंबड उडण्याची शक्यता appeared first on पुढारी.