ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य

घनसावंगी: पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण कथाकार, कादंबरीकार नाटककार व साहित्यिकांमध्ये संस्काराची शिदोरी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक व साहित्याचे बीज रोवण्यासाठी साहित्य संमेलन होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. दासू वैद्य यांनी केले. संत रामदास महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन 2022, या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन व बोधचिन्हाच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार शिवाजीराव चोथे, प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव आंबेकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र परदेशी, राजकुमार तांगडे, प्रा. रमेश भुतेकर, कवयित्री प्रा. डॉ. संजीवनी तडेगावकर, रवींद्र तौर, संस्थेचे सचिव विनायक चोथे, नंदकुमार देशमुख, आसाराम बोराडे, संतोष सांबरे, दिलीप खिस्ते, सुभाष बोंद्रे, मसापाचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्ध नाट्य लेखक व कलावंत राजकुमार तांगडे म्हणाले की, घनसांवगी तालुक्याला आद्य कवियत्री महदंबा, संत रामदास स्वामी यांच्या साहित्याची परंपरा आहे. ही परंपरा जोपल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळेल. साहित्य संमेलन आयोजित करून साहित्याची पंढरी म्हणून या घनसावंगी तालुक्याला ओळख मिळणार आहे.

प्रा. संजीवनी तडेगावकर म्हणाले की, साहित्य संमेलनातून अनेक नवोदित कलाकार व कवी, लेखक, साहित्यिक निर्माण होत असतात. म्हणून आपण समाजाला काय देतो, समाज आपल्याकडून काय अपेक्षा करतो, या सर्वांच्या विचाराची मेजवानी या साहित्य संमेलनातून प्राप्त होत असते.

स्वागताध्यक्ष शिवाजीराव चोथे यांनी सांगितले की, स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या वतीने हे मराठवाडा साहित्य संमेलन येत्या डिसेंबरमध्ये संत रामदास महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य- दिव्य होईल.

जिल्हाध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद प्रा. रमेश भुतेकर , घनसावंगी नगराध्यक्ष पांडुरंग कथले, कवियात्री प्रा. ज्योती धर्माधिकारी, गट शिक्षाणाधिकारी रविंद्र जोशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, माजी नगराध्यक्ष सुभाष बोंद्रे, श्रीकृष्ण बोबडे, रविंद्र तौर, संपादक दिलीप खिस्ते, शहाजीराव देशमुख, देवनाथ जाधव, रामेश्वर वाडेकर, जयमंगल जाधव, तालुका प्रमुख उद्धव मरकड, महादेव काळे, हरिहर शिंदे, कल्याण सपाटे, राजेश देशमुख, राम सावंत, हनुमान धांडे, रवींद्र जोशी, पंडितराव तडेगावकर, प्रा. ज्योती धर्माधिकारी, डॉ. राम गायकवाड, प्राचार्य फैयाज पठाण तसेच घनसावंगी तालुक्यामधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व मराठी विषयाचे सहशिक्षक व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत रामदास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र परदेशी यांनी केले. प्रा. डॉ.गजानन अवचार यांनी सूत्रसंचालन केले. मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रल्हाद होंडे यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का ? 

The post ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य appeared first on पुढारी.