Site icon

चांदीतही घसरण : लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रतितोळा 64 हजार इतक्या विक्रमी पातळीवर गेलेले सोन्याचे दर तब्बल चार हजारांनी कमी झाले आहेत. नाशिकमध्ये सोन्याचा दर शनिवारी (दि. 24) 60 हजारांपेक्षा कमी नोंदविल्याने, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच चांदीच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस लग्नतिथी असल्याने, यजमानांना हा मोठाच दिलासा म्हणावा लागेल.

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दराने विक्रमी स्तर गाठला होता. ऐन लग्नसराईत दर वाढल्याने, सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या रोडावली होती. 60 हजारांचा दर गाठल्यानंतर दर स्थिर होतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, दर प्रतितोळा 64 हजारांवर गेल्याने सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे दर सातत्याने वाढत होते. दरम्यान, आता सोन्याचे दर कमालीचे उतरले असून, नाशिकमध्ये सोन्याच्या दरात तब्बल चार हजारांची घसरण झाली आहे. 64 हजारांवर गेलेला 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 59 हजार 940 रुपये इतका नोंदविला गेला, तर 22 कॅरेट प्रतितोळा 54 हजार 280 रुपये इतका नोंदविला गेला. दरम्यान, जागतिक पातळीवर बँकांचे व्याजदर वाढल्याने अनेक गुंतवणूकदार हे बँंकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वळल्याने सोन्याची मागणी कमी झाली होती. परिणामी सोन्याचे दर कमी होत असल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चालू महिन्याच्या अखेरीस 26,27 व 28 या तारखांना लग्नतिथी असल्याने यजमानांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल.

ग्राहकांची गर्दी
चांदीचा दर प्रतिकिलो 72 हजारांवर गेला होता. मात्र, त्यातही कमालीची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (दि. 24) नाशिकमध्ये चांदीचा दर प्रतिकिलो 70 हजार 658 रुपये इतका नोंदविला गेला. दरम्यान, दर कमी झाल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत आहे.

हेही वाचा:

The post चांदीतही घसरण : लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा appeared first on पुढारी.

Exit mobile version