Site icon

चांद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी यासाठी तरुणाचे सप्तशृंगी देवीला साकडे

तुषार बर्डे

सप्तशृंगीगड ; पुढारी वुत्तसेवा

गेल्या 40 दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहात आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. आज बुधवारी सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे ‘चांद्रयान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.

आज संपूर्ण जगाचे व भारताचे लक्ष या मोहीमेकडे लागले असतानाच ही मोहीम यशस्वीपणे पार पडावी यासाठी एका तरुणाने सप्तशृंगीमातेला साकडे घातले आहे. सप्तशृंगगडावरील युवक रोहित बेनके याने आज सकाळी आई सप्तशृंगीला चांद्रयान 3 मोहीम यशस्वीपणे पार पडावी यासाठी साकडे घातले. सकाळी देवीची महापुजा होते, त्यावेळेला देवीच्या मंदिरात जाऊन ही मोहिम यशस्वीपणे पार पडावी यासाठी त्याने देवीला प्रार्थना केली आहे.

हेही वाचा :

The post चांद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी यासाठी तरुणाचे सप्तशृंगी देवीला साकडे appeared first on पुढारी.

Exit mobile version