जळगावात सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : देशात हिंदू समाजावर वाढलेला हिंसाचार हा दिवसेंदिवस वाढत असून समाज बांधवांना जीवे ठार मारण्याच्या खुलेआम धमक्या दिले जात आहे. हा प्रकार थांबला पाहिजे यासाठी रविवारी (२४ जुलै) रोजी सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येवून शास्त्री टॉवर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.

देशात वाढलेल्या हिंचाचारामुळे देशातील हिंदू समाज सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद सारखे अनेक जिहाद हिंदू समाजावर आक्रमण करीत आहेत. याशिवाय हिंदू मंदिरांची नासधूस करणे, देवी-देवतांवर असभ्य भाषेत टीका-टिप्पणी करणे, हिंदू समाज बांधवांना जीवे मारण्याच्या खुले आम धमक्या देणे हे प्रमाण वाढत चालले आहे. हा सर्व प्रकार थांबला पाहिजे यासाठी जळगाव शहरातील सकल हिंदू समाज एकत्रीत येवुन शास्री टॉवर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.

या मूक मोर्चात हजारोंच्या संख्येत लोक सहभागी झाले. मोर्चाच्या अग्रस्थानी भारतीय संविधान हाती घेऊन एक बालिका तर राष्ट्रध्वज व भगवाध्वजासोबत ५ मशाली हाती घेऊन सुरूवात करण्यात आली. मूक मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मोर्चात योगेश्वर गर्गे यांनी मार्गदर्शन तर सूत्रसंचालन नारायण अग्रवाल आणि आभार मोहन तिवारी यांनी मानले.

या मोर्चात सर्व हिदुत्ववादी संघटना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, सार्वजनिक गणेश महामंडळ, हिंदू महासभा, हिंदू जागरण मंच, हिंदू राष्ट्रसेना, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, सनातन संस्था, एमआयडीसीतील उद्योजक, व्यापारी संघटना, विविध आध्यात्मिक क्षेत्रांतील महंत यांच्यासह शहरातील विविध समाजाचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित व्यक्ती आदींनी सहभाग नोंदविला.

हेही वाचलंत का? 

The post जळगावात सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला appeared first on पुढारी.