Site icon

जळगाव : अमळनेर येथे दोन गटात दगडफेक ; १६ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव : अमळनेर शहरात रात्री उशिरा मोठा वाद उद्भवला. यामुळे दोन गटात दगडफेकीची घटना घडली. शहरात चार ठिकाणी दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, शहरात तणावपुर्ण शांतता आहे.

याबाबत सविस्तर असे कि, अमळनेर शहरात गुरुवारी सकाळी वाद झाला होता. मात्र, स्थानिकांच्या मध्यस्थीने हा वाद जागेवरच मिटला. परंतु रात्री उशिरा पुन्हा यावरुनच दोन गट आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. हा वाद चिघळल्याने दोन्हीकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगविताना दोन पोलिसांनाही दगड लागले आहेत. शहरातील भोई वाडा, मण्यार मोहल्ला, कासार गल्ली भागात दोन गटात दगडफेक झाली.

जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी लागलीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यावर तणावपूर्ण शांतता पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा : 

The post जळगाव : अमळनेर येथे दोन गटात दगडफेक ; १६ जणांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Exit mobile version