जळगाव: आगीत शेतातील मका जळून खाक

आग

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जळगाव तालुक्यातील आव्हाणा शिवारातील शेतात विद्युत तारांना झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत शेतातील सव्वा लाख रुपये किंमतीचा मका जळून खाक झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

जळगाव तालुक्यातील आव्हाणा येथे प्रदीप मंगल पाटील (वय ४१) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ते शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे आव्हाणा शिवारातील शेत गट नंबर ५१७ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी रब्बी हंगामात मकाचे कणीस काढून ठेवलेले होते. शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे शेतातील मकाला आग लागली. यात मकासह चारा जळून खाक झाल्याने सव्वा लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक गुलाब माळी करीत आहे.

हेही वाचा 

The post जळगाव: आगीत शेतातील मका जळून खाक appeared first on पुढारी.