Site icon

जळगाव एलसीबी निरीक्षकांची मुख्यालयात तडकाफडकी बदली

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री उशिरा तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव गुन्हे शाखा निरीक्षकांचा जिल्ह्यात सर्वाधिक दबदबा असतो हे सर्वश्रृत आहे. शिवाय या पदावरील खुर्ची मिळण्यासाठी अधिकार्‍यांमध्ये मोठी चढाओढदेखील असते. मात्र या पदावरील अधिकार्‍याची पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी बदली केल्यानंतर प्रचंड खळबळ पोलीस दलात उडाली आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या कार्यकाळात अनेक खुनांसह कठीण गुन्ह्यांचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते. शिवाय गुन्हे डिटेक्शनचे प्रमाणही अलिकडच्या काळात वाढल्याचे दिसून आले होते. मात्र असे असताना अचानक निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने आश्चर्यदेखील व्यक्त केले जात आहे. मंगळवारी रात्री ११.३० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

The post जळगाव एलसीबी निरीक्षकांची मुख्यालयात तडकाफडकी बदली appeared first on पुढारी.

Exit mobile version