जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ ची नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ बँक खात्यात वितरित करण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केल्या.

जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव तालुक्यांमध्ये कमी व जास्त तापमान, वादळी वारा व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्ह्यातील अंदाजित पात्र ५० हजार विमाधारक शेतकऱ्यांसाठी रक्कम ३७५ कोटी रुपये झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी केळी पीकविमा उतरवला होता. नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. ना. महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पीकविमा समितीचे अध्यक्ष या नात्याने विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन appeared first on पुढारी.