जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्याच्या राजकीय वातावरणात सद्यस्थितीत राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे” अशी चर्चा सुरू असतानाच गुलाबराव पाटलांनी हे याबाबत  सूचक असे विधान केल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे पाळधी येथील निवासस्थानी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटलांनी काही राजकीय आडाखे देखील व्यक्त केले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीच्या बाजूने जातील, अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे दोन ते तीन वेळेस नॉटरिचेबल झाल्याचीही चर्चा होती. याच अनुषंगाने मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, हवामानाचा अंदाज असा दिसतोय की, राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल असे दिसत आहे. अजित पवार आता थांबणार नाहीत, असे मला वाटते. अजित पवार हे डॅशिंग नेता आहेत. ते नॉटरिचेबल वाले नेता नाहीत. 24 तास काम करणारा खंबीर असा माणूस आहे. कोणताही निर्णय घेताना ते घाबरणारे नाहीत. सध्या जुळवाजुळव करण्याला थोडा वेळ लागतो आहे. परंतु ते जेव्हा होईल तेव्हा शिवसेना भाजपाचा पाऊस जोरदार पडेल, असे सांगत त्यांनी राजकीय वातावरणात असलेली उत्सुकता वाढीस लावली आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात खळबळ appeared first on पुढारी.