जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक लांबणीवर

जिल्हा दूध संघ www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सुरू असलेल्या सहकारी संस्थांच्या तसेच ग्रामपंचायत निवडणुका पाहता राज्यातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याने जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. दरम्यान या निवडणुकीबाबत पुढील निर्णय 20 डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर 29 नोव्हेंबरला अंतिम उमेदवारी यादी व चिन्हवाटप करण्यात आले. राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून, मतदारांना निवडणुकीत सहभाग जास्तीत जास्त नोंदविण्यात यावा, यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे जिल्हा दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्याबाबतचे आदेश सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक लांबणीवर appeared first on पुढारी.