Site icon

जळगाव : झोका घेत असताना मुलाचा करूण अंत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

अमळनेर शहरातल्या मुंदडानगर भागातील एका १५ वर्षाच्या मुलाचा झोका घेत असताना गळ्याला गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील वेदांत संदीप पाटील (१५) हा विद्यार्थी त्याच्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. त्यामुळे त्याचा करूण अंत झाला आहे. वेदांत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहे. वेदांतवर ओढवलेल्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : झोका घेत असताना मुलाचा करूण अंत appeared first on पुढारी.

Exit mobile version