जळगाव : तमाशात नाचताना व्हिडीओ व्हायरल; सहाय्यक फौजदाराचे निलंबन

नाशिक पोलिस,www.pudhari.news

जळगाव : तालुक्यातील खेडी बु. येथे तमाशाच्या फडात नाचणार्‍या सहाय्यक फौजदार भटू विरभान नेरकर याच्यावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबनाची कारवाई केली असून याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात जळगाव शहरातील निवृत्ती नगरात वाळू व्यावसायातील वर्चस्वाच्या वादातून भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे) या तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. या प्रकरणी भूषण रघुनाथ सपकाळे व मनिष नरेंद्र पाटील या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील संशयितांकडून खुनाच्या घटनेच्या काही दिवसांअगोदर गावात तशामा आयोजित केला होता. या तमाशात सहायक फौजदार भटू नेरकरसह एका अन्य कर्मचाऱ्याने हजेरी लावली होती. ते दोघे तमाशाच्या फडात नाचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.

यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी याची चौकशी लावली होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर भटू विरभान नेरकर यांना निलंबीत करण्यात आले असून याच प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या दुसर्‍या कर्मचार्‍याची देखील कसून चौकशी सुरू आहे. त्याचा या प्रकरणात नेमका काय सहभाग आहे?, यात तथ्य आढळल्यास त्याच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : तमाशात नाचताना व्हिडीओ व्हायरल; सहाय्यक फौजदाराचे निलंबन appeared first on पुढारी.