जळगाव दूध संघात शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले

जिल्हा दूध संघ www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा दुध संघात झालेल्या अखाद्य तूप अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यात कार्यकारी संचालक, प्रशासन अधिकारी व इतर अधिकारी-कर्मचारी यांना अटक झाली आहे. या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्राने खळबळ उडाली आहे. चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकल्याचा दावा आ. चव्हाण यांनी केला. याप्रकरणी सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी लक्ष घालण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे की, दुध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने प्रशासनाने दैनंदिन कामकाजावर सुरळीत ठेवण्यासाठी व्यवस्था करणे क्रमप्राप्त होते. तसेच कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार संघातील इतर तत्सम अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक होते. आचार संहिता असताना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे चेअरमन यांच्याकडे असतात, तरी सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे दुधाचे ९ कोटींचे पेमेंट थकले आहे. इतर दूध संकलन व वितरण करणारी वाहने यांचे पेमेंट थकीत झाले आहे. तरी चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुध संघातील दैनंदिन कामकाज, दुध उत्पादक शेतकरी व संस्था यांना येणाऱ्या वरील अडचणींची तत्काळ दखल घ्यावी. दैनंदिन कामकाज सुरळीत होण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी पत्राव्दारे केली आहे.

हेही वाचा:

The post जळगाव दूध संघात शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले appeared first on पुढारी.