जळगाव : पावसाचा जोर कायम; हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले

जळगाव पाऊस

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात बुधवापासून सुरू असलेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यात बुधवारी दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री तीन वाजेपासून पावसाचा जोर वाढल्याने नद्या, नाल्यांना पूर आला आहे. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. जळगाव जिल्ह्याची तहान भागवणार्‍या गिरणा धरणात सुमारे ८० टक्के पाणीसाठा आहे. १९६९ मध्ये तयार झालेल्या गिरणा धरणाच्या ५१ वर्षांच्या काळात हे धरण आतापर्यंत ११ वेळा शंभर टक्के भरल्याचा इतिहास आहे. आतापर्यंत सलग तीन वेळा धरण भरल्याचे रेकॉर्ड असल्याने यंदाच्या पावसाळ्यात सलग चौथ्यांदा धरण भरेल, अशी आशा आहे.

रावेर तालुक्यातील मंगळुर मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. बुधवारी रात्री दोन वाजता हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. रावेर तालुक्यात पहिलाच दमदार पाऊस कोसळत असल्याने पावसाचा रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे. रावेर तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीतदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : पावसाचा जोर कायम; हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले appeared first on पुढारी.