Site icon

जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पेट्रोलपंपावर एकाने बंदुकीचा धाक दाखवून ३६ हजार रुपये लुटल्याची घटना अमळनेर तालुक्यातील डांगर शिवारात गुरुवारी (दि.23) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

अमळनेर तालुक्यातील डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर काळ्या रंगाच्या रुमालाने चेहरा बांधलेला एक जणाने प्रवेश केला. त्याने पंपावरील कर्मचाऱ्यांना झोपेतून उठविले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोल- डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले. त्याचवेळी एक ग्राहक चारचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला असता लुटारूने त्याच्या वाहनाच्या डीकीला लाथ मारून वाहनचालकास बाहेर निघण्यास भाग पाडले. ग्राहकालाही बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करत त्याच्याजवळील असलेले पैशाचे पाकीट हिसकावून अमळनेरकडे पसार झाला. त्याचवेळी त्याचा एक साथीदार मोटरसायकल घेऊन आला. त्यानंतर दोघेही मोटरसायकलने धुळ्याकडे पसार झाले. याबाबत नरेंद्र सोनसिंग पवार (रा. रणाइचे, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे पुढील तपास करीत आहेत.

घटनास्थळी पोलिस अधीक्षकांनी दिली भेट

पेट्रोलपंपावरील कर्मचारी नरेंद्र सोनसिंग पवार याच्याकडून १३ हजार, किशोर रवींद्र पाटील याच्याकडून १४ हजार व डिझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय दिलीप भामरे याच्याकडून नऊ हजार रुपये असा एकूण ३६ हजार ५०० रुपये या चोरट्याने हिसकावून नेला आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली.

हेही वाचा:

The post जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला appeared first on पुढारी.

Exit mobile version