जळगाव : बकालेंच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

आंदोलन www.pudhari.news
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतून बडतर्फ करून तत्काळ अटकेच्या मागणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांकडून बुधवारी (दि.19) बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव एलसीबीचे पोलिस निरीक्षक बकाले यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाने आक्रमक होऊन ठिकठिकाणी कारवाईबाबत आंदोलने केली. त्यानंतर बकालेंना निलंबित करण्यात आले; परंतु त्यांना सेवेतूनच बडतर्फ करून तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात मराठा समाजबांधवांनी साखळी आंदोलन सुरु केले आहे. तर आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करुन पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. पोलिसांकडूनच जाणूनबुजून पाठराखण होत असल्याचा आरोप समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

हेही वाचा:

The post जळगाव : बकालेंच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन appeared first on पुढारी.