Site icon

जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक

जळगाव : एरंडोल येथील एका शिक्षण संस्थेतून दुसर्‍या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून ७५ हजारांची लाच धनादेशाच्या स्वरुपात स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापकासह लिपीकास रंगेहात अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत. या संस्थेने तक्रारदार यांची व त्यांचे उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली १ एप्रिल २०२३ रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल, धरणगाव येथे बदली केली होती. बदलीस स्थगितीसाठी मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव आणि कनिष्ठ लिपीक नरेंद्र उत्तम वाघ यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी उपशिक्षक यांचेकडे स्वत:सह सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव संचलित महात्मा फुले विद्यालय एरंडोलचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन यांच्यासाठी दोघा शिक्षकांचा पुर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना ७५ हजार रुपये धनादेशाच्या स्वरूपात मागणी केली.

तिघांवर गुन्हा दाखल…दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे याबाबत तक्रार केली. यानुसार एसीबीचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने आज महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव यांना धनादेश स्विकारतांना रंगेहात अटक केली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात विनोद शंकर जाधव, (वय-४२), नरेंद्र उत्तम वाघ (वय- ४४) आणि विजय पंढरीनाथ महाजन (वय- ५६) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई…
ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक एन.एन.जाधव, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ. सचिन चाटे, एस.के. बच्छाव, पोलीस निरीक्षक, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. किशोर महाजन, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.ना. बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली.

हेही वाचा : 

The post जळगाव : बदली रोखण्यासाठी शिक्षकांकडून घेतली लाच; मुख्याध्यापकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.

Exit mobile version