जळगाव : मुक्ताईनगरला कॅरिबॅगमध्ये गुंडाळून तिचा मृतदेह फेकला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

कायदा व्यवस्थेचे तीन तेरा झाले असून, जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. मुक्ताईनगरला एका महिलेची अतिशय क्रूरतेने हत्या झाली असून, तिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या कॅरिबॅगमध्ये गुंडाळून फेकून दिल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस सोमवारी (दि.29) एका महिलेची हत्या झाल्याचे आढळले. महिलेची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर आरोपी संशयिताने मृतदेह हा जाड प्लास्टिकच्या कॅरिबॅगमध्ये भरून फेकून दिल्याचे आढळून आले आहे. संबंधित महिलेची ओळख पटलेली नसून, साधारणपणे ४० ते ४५ वयोगटातील ही महिला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह हा वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, या प्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : मुक्ताईनगरला कॅरिबॅगमध्ये गुंडाळून तिचा मृतदेह फेकला appeared first on पुढारी.