Site icon

जळगाव : लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागून सुट्टीच्या दिवशी ती तलाठी कार्यालयात स्वीकारताना लाचखोर तलाठ्यासह महिला कोतवालास जळगाव एसीबीने शुक्रवारी (दि. १४) दुपारी अडीच वाजता रंगेहाथ अटक केली. भडगाव तालुक्यातील भोरटेक बु.॥ तलाठी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हे भडगाव तालुक्यातील भोरटेक येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे वडीलोपार्जीत जमीन आहे. या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. वारसांची नावे लावण्यासाठी तलाठी सलीम अकबर तडवी (वय-४४) याने सुरूवातीला १ हजार रूपयांची लाच घेतली होती. त्यानंतर पुन्हा तक्रारदार यांच्याकडे १ हजार ५०० रूपयांची मागणी महिला कोतवाल कविता नंदु सोनवणे (वय-२७) यांनी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी एसीबीने शुक्रवारी १४ एप्रिल रोजी दुपारी सापळा रचला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय सुटी असली तरी सुट्टीच्या दिवशी तलाठी आणि कोतवाल हे तलाठी कार्यालयात होते. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून १ हजार ५०० हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पुणे: बस प्रवासात मोबाईल चोरट्याला पकडले

यांच्या पथकाने केली कारवाई…
हा सापळा जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सफौ दिनेशसिंग पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहिरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोना जनार्दन चौधरी, पोना किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळु मराठे, पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ सचिन चाटे, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ प्रणेश ठाकुर यांनी यशस्वी केला.

हेही वाचा : 

The post जळगाव : लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version