जळगाव : वीज कोसळल्याने बापलेकाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील घटना

जळगाव : वीज कोसळल्याने बापलेकाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील घटना

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या बापलेकावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन्ही बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील न्हावे गावात आज (दि. ९) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. तर या घटनेत शेतात काम करणाऱ्या मजूर महिला सुदैवानं बचावल्या आहेत. (lightning strike father son death)

याबाबत सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यातील न्हावे गावातील आबा शिवाजी चव्हाण हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. त्यांची न्हावे शिवारात शेतजमीन आहे. त्यात यंदा कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी आबा चव्हाण, पत्नी व मुलगा दीपक आबा चव्हाण हे शेतातील कापसाला खत घालण्यासाठी गेलेले होते. त्यात दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे पावसापासून बचाव व्हावा यासाठी तिघेजणे शेतातल्या शेवगाच्या झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत आबा चव्हाण आणि मुलगा दिपक आबा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. (lightning strike father son death)

या घटनेत महिला थोडक्यात सुदैवाने बचावल्या आहे. या घटनेने चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेनंतर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मृताच्या पश्च्यात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे न्हावे गावात शोककळा पसरली आहे. (lightning strike father son death)

The post जळगाव : वीज कोसळल्याने बापलेकाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील घटना appeared first on पुढारी.