Site icon

जळगाव : शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळण्यासाठी शिवसेना आक्रमक

जळगाव : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून, रब्बी हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाटाद्वारे पाणी सोडावे, पाटचाऱ्या दुरुस्ती करण्यात याव्या, या मागणीसाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात धरणगाव येथील उपविभागीय पाटबंधारे कार्यालयावर धडक देऊन अभियंता विजय जाधव यांना निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, रब्बी हंगामसाठी नोव्हेंबरचा शेवटच्या आठवड्यात पाणी सोडावे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पीक घेण्यासाठी एकूण ५ आवर्तन सोडण्यात यावे, तसेच गिरणा कलवा सल्लागार समिती बैठक घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हा ऍड शरद माळी, राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख धिरेंद्र पुरभे, भागवत चौधरी, जानकीराम पाटील, नंदू पाटील, नगरसेवक जितू धनगर, भीमराव धनगर, सुनील चव्हाण, भगवंत मोरे, सम्राट धनगर, नंदू पटूने, राहुल रोकडे, ज्ञानेश्वर महाजन यासह शेतकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

जळगाव,www.pudhari.news

हेही वाचा :

The post जळगाव : शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळण्यासाठी शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.

Exit mobile version