जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने

सह्याद्री हॉस्पीटल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि.३१) जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये १५ क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानामध्ये ‘निक्षय मित्र’ सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या १५ क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे.

मनपा क्षयरोग पथक नाशिक मध्य (टीयु) झाकिर हुसेन रुग्णालय, भारतनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपचार घेत असलेल्या या क्षयरुग्णांना सामाजिक बांधिलकी आणि क्षयरोगमुक्त भारत अभियानास सहाय्य म्हणून पुढील सहा महिने ‘निक्षय मित्रा’कडून पोषण आहार देण्यात येणार आहे. सह्याद्री हॉस्पिटलचे सहायक उपाध्यक्ष संजय चावला, डॉ. मितेश निकम, डॉ. सुप्रिया जाधव, डॉ. चेतन पाटील यांच्या हस्ते पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

सहायक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी खासगी आरोग्य संस्थांची भूमिका क्षयरोग दूरीकरणासाठी महत्त्वाची असून, क्षयरुग्णांची माहिती शासनास कळविणे बंधनकारक आहे. त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्ण गमे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे भगवान भगत, संदीप गवळी, तानाजी इंगळे, अनिल कदम उपस्थित होते. महानगरपालिकेच्या क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत समाजातील सामाजिक कार्यकर्ते, संस्था, औद्योगिक संस्था, संघटना यांना क्षयरुणांना पोषण आहार देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले.

हेही वाचा:

The post जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने appeared first on पुढारी.