जामनेर तालुक्यात गारपीटीमुळे चारशेच्यावर मेंढ्या दगावल्या

चारशेच्यावर मेंढ्या दगावल्या

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा जामनेर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे पहूरसह परिसरातील माळरानावर चारशेच्यावर मेंढ्या ठार झाल्याची धक्‍कादायक माहिती मिळत आहे. तर काही मेंढ्यांना स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यात यश मिळाले आहे. अवकाळी वादळी पावसामुळे मेंढपाळांची मोठी आर्थिक हानी झाल्याचे दिसून येत आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर येथे सलग पाचव्या दिवशी पहूर गारपीटसह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहूर पासून जवळच असलेल्या सोनाळा फाटा परिसरात काही मेंढपाळ आहेत. या ठिकाणी झालेल्या गारपीटीमुळे शेकडो मेंढ्या दगावल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार चारशेच्यावर मेंढ्या दगावल्या असून, काही मेंढ्यांना स्थानिकांच्या मदतीनं पशुचिकीत्सा रुग्णालयात दाखल करुन वाचविण्यास यश मिळाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मेंढ्या दगावल्याने मेंढपाळांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करुन नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

हेही वाचा :  

The post जामनेर तालुक्यात गारपीटीमुळे चारशेच्यावर मेंढ्या दगावल्या appeared first on पुढारी.