Site icon

टोमॅटो प्रती क्रेट २१०० रुपये भाव शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : पेठरोड येथील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात मंगळवार (दि ०४) रोजी झालेल्या लिलावात टोमॅटोच्या प्रती क्रेटला कमाल ऐकविशे रुपये तर सरासरी १४०० रुपये भाव मिळाला. तरी शेतकऱ्यांनी शरदचंद्रजी पवार मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन यावा असे आवाहन सभापती देविदास पिंगळे यांनी केले आहे. टोमॅटोला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सद्यस्थितित नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत त्रंबक, निफाड, दोडी व संगमनेर व सिन्नरहुन तसेच शहरालगत असलेल्या भागातून टोमॅटोची आवक होत आहे. यात सर्वाधिक टोमॅटो आवक ही सिन्नर येथील धुळवड व कळवण येथील अभोणा येथून होत आहे. मंगळवार (दि ०४) रोजी आवक ३८०० जाळी झाली. यात कमाल दर २१०० रुपये मिळाला असून, सरासरी १४०० रुपये प्रति जाळी दर मिळाला आहे. टोमॅटोच्या दरात भाव वाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

The post टोमॅटो प्रती क्रेट २१०० रुपये भाव शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण appeared first on पुढारी.

Exit mobile version