त्र्यंबकेश्वरला 26 जानेवारीला कुस्त्यांची दंगल, कोण जिंकणार चांदीची गदा…?

कुस्ती स्पर्धा

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथे गुरूवारी (दि.26) कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पहिलवान शांताराम बागुल यांनी 1 मे 2010 रोजी कुस्त्यांची विराट दंगल भरवली. तेव्हा पासून येथे दरवर्षी दंगल आयोजित केली जाते. मात्र, यंदापासून 1 मे ऐवजी प्रजास्ताक दिनी दंगल घेण्याची ठरविले आहे.

यापूर्वी नरसींग यादव, हर्षल सदगीर या महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेत्या पहिलवानांनी येथे मानाची चांदीची गदा जिंकलेली आहे. यावर्षी बारामतीचे पहिलवान भारत मदणे आणि दिल्लीचे पहिलवान सुखचेण गुलिया यांची लढत होणार आहे. या कुस्त्यासाठी एक हजारापासून दोन लाख रूपयांपर्यंत तसेच चांदीची गदा असे इनाम आहेत. संस्थापक अध्यक्ष पहिलवान शांताराम बागुल यांच्या मागर्दशनाखाली कुस्ती स्पर्धांचे अध्यक्ष दीपक लोखंडे, कार्याध्यक्ष राजाभाऊ घुले यांनी नियोजन केले आहे. ञ्यंबकेश्वर येथील अभिनव कॉलेज समोर दक्षिणमुखी हनुमान मंदिर, जव्हार फाटा येथे कुस्त्यांची विराट दंगल रंगणार आहे.

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वरला 26 जानेवारीला कुस्त्यांची दंगल, कोण जिंकणार चांदीची गदा...? appeared first on पुढारी.