त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ

त्र्यंबकेश्वर,www.pudhari.news

त्र्यंंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
पावसाला बर्‍यापैकी सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी-नाले प्रवाहित झाले असून, डोंगर धुक्यात बुडाले आहेत. या बहरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरात हौशी पर्यटकांची झुंबड उडत आहे. रस्त्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असून, त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटकांनी गजबजलेला दिसून येत आहे.

आसामच्या गुवाहटीतून निसर्गसौंदर्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी वर्णन केलेल्या ‘काय डोंगार काय झाडी’ या शब्दांची अनुभूती या परिसरातही येत असून, तरुणाई पहिने बारीत जत्थ्याने भ्रमंती करताना दिसत आहे. जवळच असलेल्या झोपडीतील हॉटेलांकडेही तरुणाईची झुंबड उडत असून, भोजनाचा आनंद निसर्गाच्या सान्निध्यात घेत आहेत. यामुळे या परिसरातील व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, मक्याचे कणीस विक्रेते, पाववडे विक्रेते यांना दोन पैसे कमावण्याची संधी मिळाली आहे. अशाच प्रकारे हरिहर, दुगारवाडी, तोरंगण घाट, अंजनेरी, ब्रह्मगिरी या परिसरातदेखील निसर्गसहलींसाठी गर्दी वाढलेली दिसून येत आहे.

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ appeared first on पुढारी.