त्र्यंबकेश्वर मंदिरातही मास्क सक्ती, कोरोना संक्रमणामुळे खबरदारी

त्र्यंबकेश्वर दर्शन,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेता, त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडूनही भाविकांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच गर्दी टाळण्याबाबत मंदिर ट्रस्टकडून आवाहन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून शुक्रवारी (दि. 23) झालेल्या आढावा बैठकीत याबाबत आदेशित करण्यात आले आहे. दरम्यान, त्र्यंबक नगरपरिषद प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन, अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये कोविड- 19 विषाणूचा बी. एफ 7 हा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. तो वेगाने पसरत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केल्या जात असून, त्याचाच भाग म्हणून नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, आरोग्य सभापती सागर उजे, मुख्याधिकारी संजय जाधव यांनी बैठक घेत सज्जतेबाबतचा आढावा घेतला.

त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. कोरोनाचे संकट पुन्हा येत असल्याने सर्वांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे.

– पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबक नगर परिषद

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वर मंदिरातही मास्क सक्ती, कोरोना संक्रमणामुळे खबरदारी appeared first on पुढारी.