Site icon

दक्षिण कोरियाच्या सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जळगावच्या सईची निवड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सई अनिल जोशी हिची दि. 2 ते 8 एप्रिल दरम्यान दक्षिण कोरियाच्या सेऊल येथे आयोजित वुमन एशिया कप सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली.

सई ही या स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पाच मुलींची निवड झाली आहे. त्यात जळगावच्या सई जोशीसह स्वप्नाली वायदंडे (कोल्हापूर), ऐश्वर्या बोडके (पुणे), श्रद्धा जाधव (लातूर), ऐश्वर्या भास्करन (मुंबई) यांचा समावेश आहे. सई जोशी हिने यापूर्वी चीन, तैवान येथील स्पर्धांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून आतापर्यंत अनेक वेळा राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत सुवर्ण, रजत आणि कांस्य पदके मिळविली आहेत. गतवर्षी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्काराने सईला सन्मानित करण्यात आले होते. सई ही जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी व जळगाव जनता बँकेच्या अधिकारी नीलम जोशी यांची कन्या आहे. तिच्या या निवडीबद्दल क्रीडामंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवेलकर, नंदकुमार बेंडाळे आदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

The post दक्षिण कोरियाच्या सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जळगावच्या सईची निवड appeared first on पुढारी.

Exit mobile version