दिपोत्सव : प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक फटाके अन् पाण्यावर पेटणार्‍या दिव्यांचे ग्राहकांना आकर्षण

दिवे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिवाळीला रेडिमेड दिव्यांनी रोषणाईची उधळण करता येणार आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात रेडिमेड दिवे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, काही दिवे चक्क पाण्यावर पेटवता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकही या दिव्यांकडे आकर्षित होत असून, या दिव्यांची किंमतही ग्राहकांच्या आवाक्यात आहे.

येत्या 22 ऑक्टोबरपासून दीपपर्वाला सुरुवात होणार असून, त्यानिमित्त बाजारपेठ सजली आहे. कोविड महामारीच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात असल्याने, यंदाची दिवाळी सर्वांसाठीच खास आहे. अशात खरेदीलाही उधाण आले असून, बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. वेगवगेळ्या रंगाचे आकाशकंदील, पणत्या, विविध रंगांच्या माळा, फिरत्या पणत्या, विद्युत माळा या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. त्यातल्या त्यात पाण्यावर चालणार्‍या पणत्या आणि प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक फटाके बाजारात आले असून, ग्राहकांची त्यास मोठी पसंती मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चायनामेड वस्तू सर्वाधिक होत्या. परंतु यंदा स्वदेशी वस्तूंचा बोलबाला बघावयास मिळत असल्याने, या वस्तू टिकाऊ आणि आकर्षक असल्याने ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे.

तेलाशिवाय पेटतो दिवा…
तेलाशिवाय पेटणार्‍या पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या पणत्या पाण्याने कशा पेटतात, याचेही ग्राहकांना विशेष कुतुहल दिसून येत आहे. वास्तविक या पणतीच्या खाली तीन बटन सेल असून, पणतीच्या आतील बाजूला एक सेन्सर बसविण्यात आला आहे. त्याला स्पर्श केल्यानंतर पणतीमधील वातीच्या ठिकाणी असलेला दिवा पेटतो. तास दोन तास पणतीला स्पर्श करून बसणे शक्य नसल्याने त्यामध्ये पाणी टाकले जाते. पाण्याच्या स्पर्शाने पणती पेटत राहते.

या इलेक्ट्रिक वस्तू विक्रीला मागणी…
लाइटवरचे दिवे, पाइप माळ, फिरणारी समई, स्टार लाइट, गणपती लाइट, झुंबर, फिरणारे बल्ब, इलेक्ट्रिक कारंजे आदी इलेक्ट्रिक साहित्य बाजारात आले आहे.

हेही वाचा:

The post दिपोत्सव : प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक फटाके अन् पाण्यावर पेटणार्‍या दिव्यांचे ग्राहकांना आकर्षण appeared first on पुढारी.