देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांना भेटणार : खडसेंची कबुली

एकनाथ खडसे,www.pudhari.news

जळगाव : गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या बाबतीत बोलताना मोठा दावा केला. खडसे यांनी देवेद्र फडणवीस यांना आपण तिघं बसून जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू… असे सांगितल्याचे गिरीश महाजन म्हणाले. यावर खुद्द आमदार खडसे यांनीच आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले “होय… मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट घेणार आहे. नाशिक मध्ये एका कार्यक्रमात मी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली. त्यावर फडणवीस म्हणाले पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला कळवतो. मी त्यांना भेटणार आहे, असं खडसे म्हणाले आहेत.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबतचे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट केले आहेत. यावर आता एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, आता मिटवायचं काय राहिलं? सर्व प्रकारे तर त्रास देण्याचे सुरूच आहेत. ईडी सुरू आहे. सीबीआय सुरू आहे. या सर्व चौकशींना मी समर्थपणे सामोरं जाणार आहे, असं खडसे म्हणालेत. तसेच गिरीश महाजन यांनी म्हटलं की, रक्षा खडसेंनी मला सांगितलं अमित शहा यांच्या ऑफिसबाहेर तीन तास बसून ठेवलं. भेट झाली नाही. याबाबत मी रक्षा खडसेंना विचारलं असता अशा प्रकारे कुठलीही चर्चा महाजनसोबत मी केली नाही, असं रक्षा खडसेंनी मला सांगितलं, असंही खडसे म्हणालेत.

Legends League Cricket : मैदानातच दोन दिग्‍गज क्रिकेटपटूमध्‍ये ‘राडा’ , जॉन्सनने दिला युसूफ पठाणला धक्‍का (पाहा व्‍हिडीओ )

गिरीश महाजन काय म्हणाले?
नाथाभाऊ हे अमित शहांना भेटायला गेले होते. त्यावेळी ते शहांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर बसले होते. तीन तास बसले होते. मला शहांच्या कार्यालयातून फोन आला होता. मी माहिती घेतली. त्याोवेळी शहांची भेट घेण्यासाठी आम्ही तीन तास त्यांच्या कार्यालयाबाहेर बसून असल्याचं रक्षा खडसे यांनीच मला सांगितलं, असं गिरीश महाजन म्हणाले. एवढा वेळ बसूनही शहा यांनी खडसेंना भेट दिली नाही. हे स्वत: रक्षा खडसे यांनीच मला सांगितलं, असा दावा महाजन यांनी केला होता.

खडसेंची फडणवीस, महाजनांना ऑफर…
नाशिकच्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात एकनाथ खडसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याजवळ आले होते. यावेळी खडसेंनी फडणवीसांना सोबत बसून जे काही असेल ते मिटवून टाकू, जाऊ द्या, अशी ऑफर दिली. सध्या त्यांचं काय ते चाललेलं आहे. त्यांच्या मनात काय मिटवायचं होतं ते कळलं नाही. कारण त्या ठिकाणी गर्दी इतकी होती आणि गोंधळ इतका होता त्यामुळे मी त्यांना विचारलं नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

The post देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांना भेटणार : खडसेंची कबुली appeared first on पुढारी.