दै. पुढारी विशेष शैक्षणिक : गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणारी के. के. वाघ शैक्षणिक संस्था

के के वाघ शिक्षण संस्था www.pudhari.news

नाशिक : 
पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ एक समाजाभिमुख, राष्ट्र कार्याला समर्पित व सर्वार्थाने समाजोन्नतीसाठी प्रयासरत असलेले समाजपुरुष होते. काळाची पावले ओळखून समाजाला योग्य दिशेने नेणारे पुरोगामी नेते होते. शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या धारणेला अनुसरून ग्रामीण विभागाच्या उत्थानासाठी सन 1970 मध्ये त्यांनी कर्मवीरांच्या प्रेरणेने के. के. वाघ शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेचे दिवंगत अध्यक्ष व आमचे प्रेरणास्थान आदरणीय कै. बाळासाहेब देवराम वाघ यांनी संस्था स्थापनेपासून विश्वस्त, उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून तब्बल 51 वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था खंबीरपणे उभी राहिली. संस्था उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यानंतर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष समीर बी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल आगेकूच करत आहे.

समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी लावलेला हा शिक्षणाचा वेलू आज गगनात झेपावतो आहे. वर्तमान परिस्थितीत के. के. वाघ शिक्षण संस्था ही नाशिक जिल्ह्यातील अग्रेसर व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणारी संस्था म्हणून नावारूपास आलेली आहे. गेल्या 51 वर्षांच्या कालावधीत संस्थेने अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणाच्या विकासावर लक्ष केंद्रित करून अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या क्षितिजावर गुणवत्तेने परिपूर्ण संस्था असा नावलौकिक मिळविला आहे. नुकतेच यूजीसीकडून के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2022-23 ते 2031-32 या 10 वर्षांसाठी ‘ऑटोनॉमस’ अर्थात स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. तसेच आजमितीस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नऊ विभागांना ‘एनबीए’ मानांकन मिळाले आहे. यामध्ये कॉम्प्युटर, प्रॉडक्शन, इलेक्ट्रिकल, केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि एमसीए यांचा समावेश आहे. नऊही विभागांना मानांकन मिळवणारे के. के. वाघ हे पुणे विद्यापीठांतर्गत नाशिक विभागातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. संस्थेची ही विकासाची वाटचाल अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित न राहता पारंपरिक शिक्षणाबरोबरच ललित कला, शिक्षणशास्त्र व कृषिविज्ञानाच्या क्षेत्रातही आपली चुणूक दाखवत आजमितीस एकूण 32 वेगवेगळ्या संस्था दिमाखात उभ्या आहेत. अनेकविविध विद्याशाखांमध्ये शिक्षण प्रदान करत असताना कलेच्या प्रांतातही संस्थेने के. के. वाघ कला अकादमी अंतर्गत फाइन आर्ट्स व परफॉर्मिंग आर्ट्स महाविद्यालय सुरू करून नवा पायंडा घातला आहे. संगीत, नृत्य, नाटक व प्रयोगजीवी कला या विभागात पदवीपर्यंतचे शिक्षण प्रदान करणारी ही एकमेव संस्था आहे. सीबीएसई शिक्षण प्रणालीच्या शाळा सुरू करून संस्थेने अद्ययावत शिक्षण व्यवस्थेचा पायंडा निर्माण केलेला असतानाच संस्थेने नाशिक व चांदोरी येथे अनुक्रमे बी.फार्मसी आणि डी. फार्मसी महाविद्यालय सुरू करून वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. सध्या संस्थेच्या विविध शाखांमध्ये 21,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून, लाखो माजी विद्यार्थी समाजात आपली वाटचाल करत आहेत. के. के. वाघ तंत्रनिकेतन, नाशिक कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग अशा विविध सात शाखांमध्ये डिप्लोमा प्रदान करणारे तंत्रनिकेतन आहे. याशिवाय ‘अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी’ हा औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कोर्सही या तंत्रनिकेतनमध्ये शिकविला जातो.

मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, भाऊसाहेबनगरचे अनोखे गुरुकुल, बँकिंग, व्यायामशाळा, कॅन्टीन, ग्राहक भांडार, स्वतंत्र पार्किंग, बसव्यवस्था, सुरक्षा कर्मचारी इ. सुविधांसह 32 महाविद्यालये, तंत्रनिकेतन, स्कूल्स कार्यान्वित आहेत. शहरी भागातून विजयाची पताका फडकवत संस्थेचा ज्ञानरथ सुविधांच्या अभावग्रस्त खेड्यापाड्यांकडेही अग्रेसर झाला आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्वप्नातला शिक्षणाने परिपूर्ण असा ग्रामीण भाग घडवण्याच्या द़ृष्टीने संस्थेने पावले उचलली आहेत. निफाड परिसरातील पंचक्रोशीतल्या गावांना उच्चशिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी संस्थेने भाऊसाहेबनगर, पिंपळस व चांदोरी येथे वरिष्ठ महाविद्यालयांची स्थापना केली आहे, तर चांदोरी येथे नवीन तंत्रनिकेतन व अद्ययावत वर्कशॉप सुरू करण्यात आले आहे. काकासाहेबनगर व नाशिक या ठिकाणीही वरिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. आगामी काळात ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रशिक्षणाची व्यवस्था थेट ग्रामीण भागात करण्याचा संस्थेचा मानस आहे. आजपर्यंत संगीत, नाट्य, नृत्य यांच्यासारख्या आविष्कारी कला फक्त विशिष्ट अभिजात्य वर्गापुरत्याच उपलब्ध होत्या. के. के. वाघ कला अकादमी अंतर्गत फाइन आर्ट्स व परफॉर्मिंग आर्ट्स महाविद्यालय सुरू करून संस्थेने सर्वसामान्य व बहुजनांसाठी कलेचा हा प्रांत खुला करून नवा पायंडा निर्माण केला आहे. असा पायंडा निर्माण करण्यामागे शिक्षण संस्थेच्या प्रबंधनाची समाजाप्रति असलेली बांधिलकी, बहुजनांचा शिक्षणविस्तार व भारतीय अभिजात कलागुणांचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार प्रतिबिंबित होतो. शुद्ध भारतीय मानसिकता, सांस्कृतिक मूल्यांचा वारसा, समाजात मूल्यनिर्माण करण्याची बांधिलकी व मातीचे उतराई होण्याच्या विचारातून अभिजात कलांना जोपासणारा हा नवा शिक्षणविचार जन्मास आला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी संस्थेने भाऊसाहेबनगर, काकासाहेबनगर, चांदोरी व पिंपळस (रामाचे) येथे कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय थांबली आहे.

– समीर बाळासाहेब वाघ, अध्यक्ष, के. के. वाघ शिक्षण संस्था.

कृषी शिक्षणात सर्वांत मोठे योगदान
अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणात एक आदर्श निर्माण करून संस्थेने कृषी शिक्षणाच्या क्षेत्रातही आपली दमदार मोहोर उमटवली आहे. कृषी महाविद्यालयांतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व उद्यानविद्या महाविद्यालय अशी सहा महाविद्यालये कार्यरत आहेत. कृषी तंत्रनिकेतन (असीळ झेश्र) हा कृषी शिक्षणातील डिप्लोमा कोर्स सुरू करावयाचा संस्थेचा मानस असून, त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. कृषी शिक्षणाच्या या सर्व विद्याशाखांमध्ये आजमितीस 1,804 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व 226 कर्मचारीवर्ग वेगवेगळ्या कृषी महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. अशातर्‍हेने महाराष्ट्रात कृषी शिक्षण देणारी संस्था म्हणून के. के. वाघ शिक्षण संस्था नावारूपाला आली आहे.

हेही वाचा:

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणारी के. के. वाघ शैक्षणिक संस्था appeared first on पुढारी.