Site icon

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’

नाशिक : 
शिक्षणासारखे पवित्र दुसरे काहीही नाही. ज्ञानदानाचा एकमेव ध्यास उराशी बाळगून, आंतरराराष्ट्रीय व सर्व स्तरातील शिक्षण समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची स्थापना झाली. जे लोक केवळ स्वप्ने पाहत नाही, तर स्वप्ने पाहत असताना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात त्यांची स्वप्ने निश्चितच साकार होतात, असा शशांक श्याम मणेरीकर सरांचा द़ृढ विश्वास आहे आणि हाच विचार आपल्या विद्याथ्यार्र्ंनीही अमलात आणून केवळ विद्यार्थिदशेतच नव्हे तर संपूर्ण जीवनात यशस्वी व्हावे, ही त्या मागची भावना आहे.

जेव्हा एखादा विद्यार्थी आमच्या शाळेत प्रवेश घेतो तेव्हा केवळ त्याला सुशिक्षित करण्याचीच नव्हे तर एक सुसंस्कृत, जबाबदार आणि अष्टपैलू नागरिक बनविण्याची नैतिक जबाबदारी आम्ही अंगीकारतो, असा विश्वास शाळेच्या विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी शाळेच्या प्रत्येक पालकास दिलेला आहे आणि पालकही आपल्या पाल्याचा केवळ वर्षागणिक अथवा महिन्यागणिक नव्हे, तर दिवसागणिक होणारा विकास आणि त्याची शैक्षणिक प्रगती कौतुकाने पाहत आहेत. मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार असे म्हणतात की, जन्माला आलेला प्रत्येक बालक हा त्या वयापासून सहाव्या वर्षापर्यंत एक अत्यंत निष्णात असा निरीक्षक असतो. त्यामुळे जे जे काही चांगले, उत्तम आहे ते ते त्याला अनुभवास द्यावे. हे धोरण शाळेने आत्मसात केले आहे. जास्तीत जास्त प्रयोगशीलता प्रत्येक विषयात आणून विविध विषय येथे शिकविले जातात. शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे या विचारसरणीला अनुसरून या शाळेतील प्रत्येक व्यक्ती काम करत असतो. या शाळेत इंटरनॅशनल म्हणजेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाते, ज्यासाठी इथे अनुभवी शिक्षकवृंद आहे. तसेच इथल्या शिक्षकांना सातत्याने शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांना बोलवून शिक्षक प्रशिक्षण दिले जाते. ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एसएससी व
सीबीएसई या दोन्ही पॅटर्नमध्ये शिक्षण उपलब्ध करून देऊन संस्थेने विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे भांडारच खुले केले आहे. शालेय अभ्यासाबरोबरच विविध खेळ, कला यांच्यावर भर देऊन विद्यार्थ्यांना सगळ्या द़ृष्टीने निपुण करण्यासाठी शाळा विशेष प्रयत्नशील आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक धड्यावर शिक्षकांनी प्रयोगशील उपक्रम व त्याबरोबरच द़ृकश्राव्य माध्यमाच्या मदतीने पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार केलेले आहेत. सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाठ्यपुस्तके शिकविली जातात व त्याचबरोबरीने शाळेने स्वत:ची व्यवसाय (वर्कशीट) स्वरूपात पुस्तके तयार केलेली आहेत, ज्याचा मुलांना अधिक सरावासाठी उपयोग होतो. अनुभव, प्रयोग व शिक्षण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून अध्ययन हे शाळेच्या शिक्षणपद्धतीचे वैशिष्ट्य आहे व त्यानुसार प्रयोगशीलतेवर भर देणारा अभ्यासक्रम योजण्यात आलेला आहे.

शाळेत Pearson कंपनीचे पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागासाठी दोन स्वतंत्र डिजिटल बोर्ड असून, प्रत्येक धडा वर्गात शिकविल्यानंतर डिजिटल क्लासमध्ये याची उजळणी केली जाते. जसे प्राथमिक विभागात विज्ञानाचा एखादा धडा शिकविल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती डीजी बोर्डवर थ्रीडी आकृतीच्या माध्यमातून समजावून सांगितली जाते. शाळेतर्फे दर महिन्याला विविध क्षेत्रांतील प्रवीण यशस्वी व नामवंत व्यक्तींना पाचारण करून त्यांची व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींचे मार्गदर्शन तर मिळतेच पण त्यांच्या मनातील आत्मविश्वासही वाढतो. स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन दिले जाते. शाळेतर्फे विद्यार्थ्यांना गणित कौशल्य Olympiad, Maths Olympiad, Abacus Maths, Homi Bhabha Junior Scientist  यांसारख्या स्पर्धा परीक्षांना बसविण्यात येते, शिवाय त्यांचे सखोल मार्गदर्शनही त्यांना शाळेतच केले जाते. या मागचा उद्देश हा आहे की, भविष्यात मुलांनी मोठमोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा उदा. MPSC, UPSC, AIEEE, GRE, TOEFEL etc. टाकाऊ वस्तू बनविण्याचा उपक्रम आम्ही वर्षातून एकदा करतो. विद्यार्थी शिक्षकांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या वस्तू जसे पेन्सिल बॉक्स, शोभेच्या वस्तू, पेपर बॅग्ज, कागदी फुले, मडक्यावरील नक्षीकाम, शिल्पकला, मूर्तिकाम, विणकाम अशा अनेक कला मुले या काळात शिकतात व नंतर त्या वस्तू शाळेत प्रदर्शन भरवून विकतात. यात मुद्दल गुंतवणूक भांडवल, कच्चा माल, पक्का माल, खरेदी-विक्री, नफा-तोटा अशा व्यवहारातल्या अनेक गोष्टींचा अनुभव विद्यार्थी घेतात व व्यवहारज्ञान मिळवितात.

-सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर, प्राचार्य, ग्लोबल व्हिजन स्कूल, अंबड, नाशिक.

शाळेच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी पुस्तक पाटी खडू फळा । याही पेक्षा खूप काही देते माझी शाळा ॥ कोलंबसची ध्येयासक्ती । चाणक्याची चाणक्यनीती ॥ विवेकानंदांचे अध्यात्म। शास्त्रज्ञांची चिकित्सक वृत्ती ॥ खेळाडूची जिद्द , कलाकाराची कलासक्तता । कवीचे कवित्व , आमची शाळा घडविते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ॥ अशा शब्दांत शाळेचे वैशिष्ट्य सांगतात.

हेही वाचा:

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’ appeared first on पुढारी.

Exit mobile version