धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर

तिरंगा www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाभरात तिरंगा यात्रेस प्रारंभ केला आहे. या  यात्रेअंतर्गत धुळे तालुक्यात हेंद्रूण गावात 111 फूटीचा तिरंगा मानाने मिरवत यात्रा काढण्यात आली. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला.

अभाविप धुळे तालुक्याच्या वतीने हेंद्रूण गावात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १११ फूट तिरंगा पदयात्रा उत्साहात काढण्यात आली. संपूर्ण देशात विविध ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव वर्ष साजरा करणार आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक घराघरात प्रत्येकाच्या मनामनात उत्साहाचे वातावरण आहे. शहरात व गाव खेड्यात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहीती यावेळी देण्यात आली. त्याबरोबरच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देखील अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने स्वातंत्र्याचा विचार गाव खेड्या वस्ती वाड्यापर्यंत पोहोचावा. या अमृत महोत्सवी वर्षाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त व्हावे. सर्व भारतीय नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे, या अनुषंगाने अभाविप धुळे तालुक्याच्या वतीने हेंद्रूण गावात १११ फूट तिरंगा पदयात्रा उत्साहात काढण्यात आली. या तिरंगा पदयात्रेत गावातील युवक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी अ.भा.वि.प. देवगिरी प्रांताचे सहमंत्री भावेश भदाणे, धुळे तालुका प्रमुख पुंडलिक भिसे, तालुका सहप्रमुख चेतन राजपूत, स्वप्निल राजपूत, हेंद्रूण गावाचे सरपंच सुरेश राजपूत, उपसरपंच दीपक नवसार यांसह आदी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

हेही वाचा:

The post धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर appeared first on पुढारी.