Site icon

धुळे : अनधिकृत संस्थेत बालकांना डांबून ठेवल्यास होणार कारवाई

धुळे : पुढारी वृत्तसेवा

अनधिकृत संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण करणे, ही गंभीर स्वरुपाची बाब आहे. त्यामुळे अशा संस्थाबाबत शोधमोहिम सुरु असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले आहे.

शिक्षेची तरतूद  याप्रमाणे..

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारीत अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील तरतुदींचे उल्लंघन करणा-या आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ४२ नुसार मान्यताप्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणा-या व्यक्तीला एक वर्ष कारावास तसेच १ लाखापेक्षा हून अधिक दंड किंवा दोन्हीही शिक्षा करण्याची तरतुद करण्यात आली आहे.  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारीत अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील तरतुदीनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेली अनाथ, निराधार, निराश्रीत, संकटग्रस्त, विधी संघर्षग्रस्त असलेली ० ते १८ या वयापर्यतच्या बालकांना अनुक्रमे बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळाच्या आदेशान्वये बालगृहात दाखल केले जाते. या योजनेअंतर्गत बालकांना संरक्षण, संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय इ. सुविधा पुरवुन त्यांच्या पुर्नवसनासाठी प्रयत्न केला जातो आहे.

सद्यस्थितीत धुळे जिल्ह्यात चार शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थाना नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे. 

  1. जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे निरीक्षणगृह / बालगृह, साक्री रोड, धुळे, जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, साक्री रोड, धुळे, अधिक्षका अर्चना पाटील, संपर्क क्रमांक : 8806268674,

2. अपंग कुष्ठरोगी स्वावलंबन संस्था संचलित शिशुगृह, ७२, उत्कर्ष कॉलनी, साक्री रोड, धुळे, अधिक्षक अतुल बिऱ्हाडे, संपर्क क्रमांक : 8308279123,

3. शासकीय ममता महिला वसतीगृह, ११,आनंद नगर, इंदिरा गार्डनजवळ, देवपुर, धुळे, अधिक्षका कविता पाटील, संपर्क क्रमांक : 9511956782.

4. परिविक्षा अधिकारी सविता परदेशी संपर्क क्रमांक : 9403465104

जिजामाता महिला मंडळ संचलित आनंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलींचे बालगृह, निमडाळे, ता. जि. धुळे (सदर संस्था प्रवेशित दाखल नसल्याने बंद आहे.) अधिक्षका भारती पाटील संपर्क क्रमांक : 8830084441

या स्वयंसेवी संस्था व्यतिरिक्त धुळे जिल्ह्यात अनधिकृतपणे सुरु असणा-या संस्थावर अथवा संस्था चालकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे देखील सचिन शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

The post धुळे : अनधिकृत संस्थेत बालकांना डांबून ठेवल्यास होणार कारवाई appeared first on पुढारी.

Exit mobile version