Site icon

धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पेसा दाखला घेण्यासाठी धुळे येथे जावे लागत होते. आता आ. मंजुळा गावीत यांच्या प्रयत्नाने पिंपळनेर तहलिस कार्यालय एकखिडकी योजनेमार्फत पेसा दाखल मिळण्याची सोय करुन दिली आहे. नुकतेच त्याचा शुभारंभ आ. मंजुळागावीत यांच्या हस्ते करण्यात आला.

आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत पेसा दाखला मिळविण्यासाठी धुळे येथे जावे लागत होते. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचा वेळेचा व पैशाचा अपव्यय होत होता. आ. मंजुळा गावीत, प्रकल्प अधिकारी तृप्ती घोडमीसे व सरपंच, विविध आदिवासी संघटना, पेसा संघर्ष समिती साक्री यांच्या प्रयत्नाने पेसा दाखला आता पिंपळनेर तहसिल कार्यालय अंतर्गत उपलब्ध होणार आहे. नुकतेच पिंपळनेर तहसिल कार्यालयात एक खिडकी योजनेचा शुभारंभ आ. मंजुळा गावीत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी साक्री तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पेसा दाखल्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. का

र्यक्रमास पंचायत समिती सभापती शांताराम कुवर, उपसभापती माधुरी देसले, पं.स.सदस्य रमेश गांगुर्डे, साक्री बाजार समिती संचालक ओंकार राऊत, भास्कर पवार, अमोल ठाकरे, मनोज सूर्यवंशी, आदिवासी बचाव अभियान धुळे जिल्हा प्रमुख गणेश गावीत, सरपंच जितु कुवर, नायब तहसिलदार बहिरम, गोटू चौरे, आदिवासी बचाव अभियान नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी टी.के.ठाकरे, शाम पाटील, आदिवासी विकास निरीक्षक सुनिल मोरे, पिंपळनेर पेसा केंद्र प्रमुख विजय खैरनार, नदीमनाना, शिवाजी साळुंके आदी उपस्थित होते.

पेसा रहिवाशी दाखला मिळणेकामी लागणारी कागदपत्रे

अनुसूचित जमातीचा दाखला,आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, स्वयंम घोषणा पत्र, संबंधित पेसा ग्रामपंचायतीचा दाखला (विहित नमुन्यात)
▪️अ.क्र.२.३ व ४ चे कागदपत्र बिगर पेसा क्षेत्रातील असल्यास खालील अतिरिक्त पुरावे सादर करणे आवश्यक राहील*
७/१२ उतारा, वारस नोंदी, मालमत्तेचा उतारा, जन्माचा दाखला, इतर पुरक पुरावे.

हेही वाचा : 

The post धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला appeared first on पुढारी.

Exit mobile version