धुळे : एमआयएम महिला आघाडीचे भाजप नेत्यांविरोधात धिक्कार आंदोलन

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत ३० कोटीच्या कामांना भाजपा लोकप्रतिनिधींच्या अट्टहासामुळे राज्यसरकारने स्थगिती दिल्याचा आरोप एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केला. याच अंतर्गत एमआयएम महिला आघाडीने भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या विरोधात आंदोलन केले.

धुळे शहरातील 80 फुटी रस्त्यावरील यंग इंडिया चौकात हे आंदोलन करण्यात आले. एम.आय.एम च्या महीला आघाडी तर्फे धिक्कार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला अध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, शकीला अन्सारी, शाहीन बी. इकबाल, फरजाना शाह, वालेमून रहेमान, अकीला बानू, रिझवान बानू, जुबेदा बानो शाह, निलोफर शाह, शबाना गुलाम मस्ताफा, पिंजारी, शाहीन वकील अहमद, हमिदा पठाण, आसेफा सैय्यद, मैमूना शेख, अकिला पिंजारी, रेहाना पिंजारी, फैमिजा अन्सारी, जिल्हाध्यक्ष नासीर पठाण, शहराध्यक्ष मुक्तार अन्सारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना महिला आघाडीच्यावतीने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर एमआयएम कार्यकर्त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले.

धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी गेल्या ३ वर्षापासून धुळे शहराच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी आणला. शहर वासियांचे रस्ते, गटार, पाणी, रेशन व अन्न-धान्य मिळवून देण्याचे तसेच दिव्यांगाना व विधवा परीतक्त्यांना व गरिबांना न्याय देण्याचे काम आमदार फारुख शाह यांनी केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. तसेच धुळे शहराचा बट्याबोळ करून देवपुरच्या खड्डे पूर करणाऱ्या मनपा प्रशासनाचा व भाजपा विरुद्ध लोकांनी आमदारांना निवेदन दिले होते. शहरातील संपूर्ण रस्ते व्हावे त्यासंदर्भात आमदार फारुख शाह यांनी शासनाकडून ३० कोटीचा निधी मंजूर करून आणला होता. परंतु खासदार सुभाष भामरे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी या कामाला स्थगिती आणण्याचे पाप केले आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला. शहराच्या विकासाला विरोध करणाऱ्या भाजपाचे नेते तसेच खा. सुभाष भामरे यांच्या विरोधात आज एम.आय.एमच्या महीला आघाडी तर्फे धिक्कार आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा :

The post धुळे : एमआयएम महिला आघाडीचे भाजप नेत्यांविरोधात धिक्कार आंदोलन appeared first on पुढारी.