धुळे : केंद्र शासनातर्फे शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर

रस्ते,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनातर्फे शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी एकूण 35 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल हे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीमधून शिरपूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी पत्रव्यवहाराव्दारे केलेल्या मागणीनुसार सावळदे (एन. एच.-52) ते शिरपूर एम डी आर – 7 किमी 0/00 ते 6/800 ता. शिरपूर, जिल्हा-धुळे पर्यंत 6.8 कि. मी. लांबीच्या काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. तसेच शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी देखील पत्रव्यवहार करून केलेल्या मागणीनुसार बोराडी ते सांगवी रोड एस एच -1 कि. मी. 87/00 ते 97/00 (बोराडी ते सांगवी) ता. शिरपूर जि. धुळे या 10 कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्ती साठी 10 कोटी रुपयांचा असा एकूण 35 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.

हेही वाचा:

The post धुळे : केंद्र शासनातर्फे शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर appeared first on पुढारी.