धुळे : केबल विक्री व्यवहारातून सुरतच्या व्यापाऱ्याची मारहाण करून लुट 

मारहाण

धुळे : पुढारी वृत्तसेवा

कॉपर केबल आणि भंगार खरेदीच्या व्यवहाराच्या बहाण्याने सुरत येथील व्यापाऱ्याला साक्री तालुक्यातील जामदे शिवारात बोलवून मारहाण करीत त्याच्याजवळीत रोकड हिसकावल्याचा प्रकार जामदे शिवारात घडला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरत येथील यमुना चौकात राहणारे यश अशोकभाई नाकरानी यांना साक्री तालुक्यातील जामदा शिवारातील नवरत पवार नामक व्यक्तीने संपर्क करून त्यांच्याकडे तांब्याची केबल आणि भंगार असल्याची माहिती दिली. या संदर्भातील व्यवहाराकरीता नाकरानी यांना साक्री तालुक्यात येण्यासाठी भाग पाडले. या कारणास्तव नाकरानी हे साक्री तालुक्यातील जामदा गावाच्या शिवारात जामदा ते डोंगराळे गावाच्या कच्च्या रस्त्यावर बोलावण्यात आले. त्यानंतर नवरत पवार यांच्यासह अन्य सहा जणांनी नाकरानी यांना मारहाण करून त्यांच्याकडील 56 हजारांचा ऐवज हिसकावून घेतला. या प्रकारानंतर नाकरांनी यांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या टोळीचा शोध  सुरू केला आहे.

हेही वाचा:

The post धुळे : केबल विक्री व्यवहारातून सुरतच्या व्यापाऱ्याची मारहाण करून लुट  appeared first on पुढारी.