धुळे : ग्रा.पं.तील संगणक घरी वापरण्याबाबत हरकत घेतल्याने तरुणाला बेदम मारहाण

मारहाण

धुळे; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीचा संगणक घरी वापरण्यासंदर्भात हरकत घेणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील सातरणे गावात घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सातरणे ग्रामपंचायतीचा संगणक ज्ञानेश्वर भूमा पाटील हे त्यांच्या निवासस्थानी वापरत होते. ही बाब निदर्शनास आल्यामुळे गावातील तरुण शेतकरी बाळकृष्ण अभिमन्यू शिंदे यांनी हरकत घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये हा संगणक जमा करण्यात यावा, असा तक्रार अर्ज केला. यावरुन शिंदे यांना ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह रवींद्र हिरामण पाटील, विनोद हिरामण पाटील, भोलेनाथ पंडित पाटील, नवनीत पंडित पाटील, ऋषिकेश सुधाकर पाटील आणि मुकेश अशोक पाटील यांनी मारहाण केली.

शिंदे यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेखाबाई पाटील यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली. शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : 

The post धुळे : ग्रा.पं.तील संगणक घरी वापरण्याबाबत हरकत घेतल्याने तरुणाला बेदम मारहाण appeared first on पुढारी.