धुळे : जिजाऊ ज्ञान मंदिर उभारणीसाठी रथ यात्रा काढणार : मराठा सेवा संघांचा संकल्प

मराठा सेवा संघ www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

स्पर्धापरिक्षांच्या काळात उच्च शिक्षणासाठी ज्ञानमंदीराची आवश्यकता असून जिजाऊ सृष्टी शिंदखेडराजा येथे अतिभव्य अशा जिजाऊ ज्ञानमंदीराची लवकरच ऊभारणी करण्याचा संकल्प मराठा सेवा संघाने केला आहे. त्यासाठी जिजाऊ ज्ञानमंदीर रथयात्रा लवकरच काढण्यात येणार असुन त्याची सुरुवात मराठवाड्यापासून करणार  असल्याची माहीती मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांनी धुळे येथील मराठा सेवा संघाच्या जनसंवाद दौ-यादरम्यान आयोजित सभेत दिली.

धुळे येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तनपुरे म्हणाले की, मराठा सेवा संघ हि १९९० मध्ये १६० सभासदांवर स्थापन केलेली सामाजिक संघटना आता जागतिक पातळीपर्यंत पोहचली आहे. यामध्ये शासकिय-निमशासकिय अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर्स ,वकिल, उद्योजक, व्यावसायिक, महिला भगिनी मिळून सभासद संख्या एक कोटीच्या वर झाली आहे. अगदी सामान्य माणसापासून ते वर्ग-१ चे अधिकाऱ्यांपर्यंत लाखो लोक मराठासेवा संघाचे पदाधिकारी आहेत. समाजातील अनेक अनिष्ट रुढी ,प्रथा परंपरा नष्ट करुन कालानुरूप बदलाप्रमाणे विज्ञानवादी समाज घडविण्याचे काम संघाव्दारे केले जात आहे.

मराठा सेवा संघाचे आजवर महाराष्ट्रात असंख्य वसतीगृहे तसेच इंग्रजी माध्यमाच्या उच्च प्रतीचे शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्याव्दारे समाजातील दुर्बल घटकातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अत्यंत अल्पखर्चात तालुका व जिल्हा स्तरावर सोयी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही उर्वरित जिल्ह्यांत, तालुकापातळीवरील मोठ्या गांवात जास्तीत जास्त ठिकाणी अशा पध्दतीने वसतीगृहे निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. मराठा सेवा संघ संचलित बॅंका व पतसंस्थेचे माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी समाजातील होतकरू तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. त्याचा देखील विस्तार होणे आवश्यक आहे .तो देखील आढावा ह्या संवाद दौऱ्यात घेतला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

कार्यक्रमप्रसंगी काही समाजबांधव व भगिनींचे विविध यश,निवड नियुक्ती बद्दल सत्कारही करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, सुलभाताई कुंवर,नुतनताई पाटील, जिल्हासचिव एस एम पाटील, उषाताई साळुंखे, साहेबराव देसाई, विभागीय अध्यक्ष दिपक भदाणे उपस्थित होते. कार्यक्रमास वसुमती पाटील,पी एन पाटील,एच ओ पाटील,डि टी पाटील, दिनेश पाटील, नितीन पाटील,छाजेंद्र सोनवणे, डॉ सुनिल पवार,प्रविण पाटील,उमेश शिंदे,ऊदय तोरवणे, गोकुळ पाटील, रामकृष्ण पाटील, अनंत पाटील, चंद्रशेखर भदाणे, उज्वल भामरे,डि ए पाटील,बी ए पाटील, आनंद पवार, मिलन पाटील, नितीन भदाणे,पी सी पाटील,दिपक नांद्रे, हेमंत भडक,अमर फरताडे,आदि पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाअध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा सचिव एस एम पाटील यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.

हेही वाचा:

The post धुळे : जिजाऊ ज्ञान मंदिर उभारणीसाठी रथ यात्रा काढणार : मराठा सेवा संघांचा संकल्प appeared first on पुढारी.