Site icon

धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

बहिरम देवाच्या यात्रेत जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने हल्ला केल्याचा प्रकार वरखेडे गावात घडला आहे. या हल्ल्यात पाच कर्मचारी जखमी झाले असून तालुका पोलीस ठाण्यात 23 जणांविरोधात दंगल तसेच शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील वरखेडे गावात बहिरम देवाचा यात्रोत्सव सुरू झाला आहे. परंतु काही समाजविघातक गावगुंडांनी उत्सवात पत्त्याचा जुगार मांडला. यााबाबत गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे योगेश विजय ठाकूर, मयूर पाटील, तुषार पारधी, जगदीश सूर्यवंशी तसेच योगेश साळवे यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी छापा टाकला. मात्र, कारवाई थांबवावी यासाठी या गुंडांनी दहशत निर्माण करत थेट पोलीस पथकावरच हल्ला करून त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती कळाल्याने उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक निरीक्षक अनिल महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी झालेल्या पाचही कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी योगेश ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींमध्ये विलास मराठे, लक्ष्मण पाटील, सुधीर धनगर, विपुल पाटील, राकेश पवार, नितीन माळी, नंदू पाटील, जयेश पाटील, सागर पाटील, कैलास पाटील, अविनाश घुमटकर, दिलीप शिंदे, मयूर भदाणे, राकेश पाटील, सागर पाटील, पंडित पाटील, मच्छिंद्र मराठे, वाल्मिक पाटील, अमोल चव्हाण, संदीप पाटील, रोहित पटेल, विकी घुमटकर, शिवाजी माळी आदींचा समावेश असून तपासात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

The post धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी appeared first on पुढारी.

Exit mobile version