Site icon

धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत केंद्र सरकारचा निषेध

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क लादल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील दहिवेल येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर कृषी मार्केट येथे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाची सर्व कांदा उत्पादकांनी होळी करुन घोषणाबाजी केली.

यावेळी दहिवेल येथील महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे साक्री तालुका उपाध्यक्ष संजय कालेश्वर बच्छाव, लक्ष्मण सूर्यवंशी, अखील भारतीय निर्मूलन संघर्ष समिती धुळे जिल्हाध्यक्ष डोंगरू बहिरम, सा. कार्यकर्ता बाबुलाल सुर्यवंशी, तुषार साबळे, बारकू ठाकरे, गबाजी साबळे, दादाजी सुर्यवंशी, मोतीलाल गांगुर्डे, दहिवेल परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या या निषेध मोर्चामध्ये दहिवेल येथील कांदा व्यापारी सोमेश्वर कृषी मार्केटचे संचालक मनोज भाऊ चौधरी, संदीप माळी, चंदूशेठ वाणी, हेमंत चौधरी यांच्यासह परिसरातील कांदा व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. आज दुपारपर्यंत जेवढी वाहने आलेली होती त्या वाहनांचा लिलाव करण्यात आला. निर्यात शुल्काचा निर्णय मागे न घेतल्यास दोन दिवसानंतर कांदा उत्पादक शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा :

The post धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत केंद्र सरकारचा निषेध appeared first on पुढारी.

Exit mobile version